Friday, February 27, 2015

मायमराठी वगैरे रोजगार देते काय?

या विश्वात भाषिक विविधता विपूल प्रमाणात आहे.

मराठी माणूस भाषिकदृष्ट्या अत्यंत सहिष्णू आहे. तो कायम आधी इतरांच्या भाषिक भावनांचा विचार करतो. इतरांची गैरसोय होऊ नये म्हणून तो स्वत:हूनच हिंदी किंवा इंग्रजीत बोलतो की मराठीची लाज वाटते म्हणून मराठीत बोलायचे टाळतो हा संशोधनाचा विषय आहे.

 तो करंटा आहे, त्याला मराठीचा न्यूनगंड वाटतो या आरोपात कितपत तथ्य आहे?

मराठी गेली ++++ . "तो अत्यंत व्यवहारी आहे, निखळ स्वार्थी आहे. ज्या भाषेत मानसन्मान, आर्थिक फायदा ती माझी अशी त्याची चतुर धारणा आहे. मायमराठी वगैरे रोजगार देते काय?"  असा त्याचा रोकडा सवाल आहे, हे खरे आहे काय?

मायबोलीसाठी ज्या गोष्टी आपण स्वत: करू शकतो, नव्हे करायलाच हव्यात त्यावर मौनाचा कट करून सरकारने काय करायला हवे, अमक्याने नी तमक्याने काय करायला हवे यावर सतत प्रवचने देणे हा त्याचा स्वभाव बनला आहे काय?

 अमृतातेही पैजा जिंकणार्‍या मराठीचे गोमटे व्हावे यासाठी "मी" काय करतो? काय करू शकतो? यावर आपले मत नोंदवा.
...........
...........
.............


राजभाषा गौरव दिनाच्या हार्दीक शुभेच्छा....

No comments:

Post a Comment