Tuesday, April 29, 2014

जेव्हा खुद्द संपादकालाच नविन माहिती मिळते!



जेव्हा खुद्द संपादकालाच नविन माहिती मिळते! {त्याच्याच संपादीत ग्रंथाबद्दल}
डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य, पत्रे आणि छायाचित्रे यांचे एकुण २२ खंड आणि संदर्भ साहित्याचे २ खंड  आजवर महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले आहेत.त्यातले १ते १६ माझ्याआधी स्मृतीशेष वसंत मून यांनी संपादीत केले होते. १७ ते २२ या खंडाचे संपादन करण्याची संधी मला मिळाली याचा आनंद वाटतो. आणि कृतार्थताही. हे खंड प्रकाशित करताना मुद्रीताशोधनाच्या निमित्ताने मी किमान ५ ते ६ वेळा वाचलेले आहेत. पत्रव्यवहाराचा खंड क्र.२१ मीच संपादीत केलेला आहे. त्याच्याबद्दल मला फेसबुकवरून एक नविनच माहिती मिळाली.मी थक्क झालो. या पोस्टवर म्हटले आहे की,
"3:-बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहतांना पत्राची सुरुवात "जय शिवराय" लिहून करत होते. महाराष्ट्र शासनाने हि पत्रे प्रकाशित केलेली आहेत." महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या या खंडात एकूण २३६पत्रे आहेत.या ग्रंथाची एकुण पृष्ठ संख्या ४३४ आहे. त्यातल्या नेमक्या कोणत्या पत्राची सुरूवात बाबासाहेबांनी "जय शिवराय" लिहून केलीय हे समजून घ्यायला मला आवडेल.निदान या खंडात तरी असे एकही पत्र नाही. मी बाबासाहेंबांची इतरही प्रकाशित / अप्रकाशित पत्रे पाहिलेली व वाचलेली आहेत. माझ्या पाहण्यात तरी असे कोणतेही पत्र आलेले नाही. {अर्थात बाबासाहेबांनी तसे लिहिले असते तरच पाहण्यात येणार ना!}
 ही चुकीची माहिती फेसबुकवर देण्यात आलीय. त्याठिकाणी आणखी माहिती दिलीय ती कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांची  आणि त्यावर दिलेला फोटो मात्र केळुस्करांचा नसून तो सीताराम केशव बोले या भंडारी समाजातील नेत्याचा आहे. ही पोस्ट वाचणारे भारावून जातात आणि खातरजमाही करीत नाहीत हे खेदजनक आहे.
....................................................................
ही संपूर्ण पोस्ट पुढीलप्रमाणे आहे.
"Satish Waghmare and Anand Wingkar shared भारतीय बौध्द महासभ's photo."
बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते **त्यातील काही निवडक गोष्टी.....
1:-महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी "जय शिवरायच्या" घोषणा दिल्या.बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्यागृहाची सुरुवात
शिवरायांचे दर्शन घेवून केली.
2:-
बेळगाव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहूने म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.
3:- बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहतांना पत्राची सुरुवात "जय शिवराय" लिहून करत होते. महाराष्ट्र शासनाने हि पत्रे प्रकाशित केलेली आहेत.
4:- ज्या मनुस्मृती या विषमतावादी ग्रंथामुळे शिवरायांचा राज्याभिषेक ब्राम्हणांनी नाकारला होता. तो मनुस्मृती हा ग्रंथ बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळून शिवरायांच्या अपमानाचा बदला घेतला.
5:- बाबासाहेब आंबेडकर लहान असतांना "कृष्णराव अर्जुन केळुस्कर" गुरुजींनी त्यांना "बुद्ध चरित्र" भेट दिले होते. या चरित्रामुळे
बाबासाहेबांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली. केळुस्कर गुरुजी जन्माने "मराठा" होते.
6:- छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर "बैरीस्टर" झाल्यावर, त्यांची कोल्हापूर शहरात रथातून मिरवणूक काढून फुले
उधळली होती.
7:- राजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी सहाय्य केले होते. सयाजीराव गायकवाड जन्माने मराठा होते.....
"चांभार घराण्यात जन्माला आलेला नेपोलीयन बोनापार्ट अर्ध्या युरोप खंडाचा बादशाह झाला. अरे ज्याच्या आई बापाचा पत्ता नाही तो रेंसमन हेरॉलड ब्रीटन चा पंतप्रधान झाला. लाहनपणी कोळशाच्या खाणीत काम करणारा अब्राहम लिंकन अमेरीकेचा राषट्राध्यक्ष झाला अरे पण मानुसकी नाकारलेल्या समाजात जन्मलेला माझा " भिमराव " या देशाचा शिल्पकार झाला..........! "
सर्वाना सप्रेम जय भीम.....! नमो बुद्धाय  जय भिम"
............................................
भारतीय बौध्द महासभा यांनी फेसबुकवर ही माहिती दिल्याचे प्रथम दर्शनी दिसते. त्यावर आत्तापर्यंत {२९एप्रिल.२०१४ सायं.९ वाजेपर्यंत} ११७ प्रतिक्रिया आलेल्या असून ५०२ जणांनी तो लाईक केलेला आहे.तर २३० जणांनी ही पोस्ट शेयर केलेली आहे, याचा अर्थ किमान काही लाख लोकांपर्यंत हा मजकूर पोचला आहे. अफवा तंत्राच्या आधारे आपले जातीय हितसंबंध आणि सत्ताधारी  राजकारण पुढे रेटण्यासाठी काही मंडळी हेतुपुरस्सर हे करीत असतात असे वाटते.

1:-... See More — with Nitin Kumar, Suyash Dada Jagtap, Bagul Prakash and 96 others.
Share
Shailesh Pardhe, Haribhau Pathode, Virji Vaghela and 499 others like this.
230 shares
6 of 117
View previous comments
......................................................
यातील इतर बाबींबाबत पुन्हा कधीतरी...


No comments:

Post a Comment