Friday, August 19, 2011

अण्णा हजारे आणि आपण


अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला माध्यमे,मध्यमवर्ग,तरुणाई,आणि विरोधी पक्षांनी अभुतपुर्व पाठींबा दिलेला आहे.दुसरीकडे मात्र सत्ताधारी पक्ष आणि सामाजिक चळवळीतील काही समाजगट अण्णांच्या आंदोलनाबाबत विरोधी/साशंकही आहेत.संसद,विद्यमान राज्यघटना,प्रचलित कार्यपद्धती आणि लोकशाही यांनाच या आंदोलनामुळे काही धोका होईल काय अशी त्यांना काळजी वाटते.अण्णांच्याभोवती असणारे काही प्रतिगामी लोक आणि शक्ती यांच्यामुळे ती बळावली असावी. एक अपुर्व सामाजिक घुसळण होत आहे. अण्णांनी आजवर कधीही जातीव्यवस्थेतुन उद्भवणा-या सामाजिक समस्यांवर भुमिका घेतलेली नाही असाही आक्षेप घेतला जातो.मात्र आण्णांच्या आजवरच्या राळेगणचा विकास, माहीती अधिकार कायदा,बदलीचा कायदा,ग्रामसभांना अधिकार आदि कामांबद्दल सर्वदुर आदरभावनाही असताना दिसते.आजची राजकीय व्यवस्था कमालीची किडलेली आहे.आजच्या संसदेतील {अपवाद वगळता}सर्व
खासदार निवडणुकीत वारेमाप पैसा उधळुन निवडुन आलेले आहेत.त्यांनी कोणीही बहुधा निवडणुक खर्चाची मर्यादा पाळलेली नसुन त्याबाबतची त्यांची प्रतिद्न्यापत्रे अक्सर खोटी आहेत,असे जनतेला अनुभवाने वाटते.भ्रष्टाचार,महागाई,बेकारी आदिंनी जनता त्रस्त आहे.भ्रष्टाचारविरोधी द्रुतगती न्यायालये स्थापण करणे,निवडणुक सुधारणा कायदा आणणे,रोजच्या जीवनात निर्धाराने भ्रष्टाचाराविरुद्ध उभे राहण्यासाठी जनमानसिकता तयार करणे,असे उपाय त्यावर योजावे लागतील.प्रश्न आहे तो सत्ताधा-यांच्या आकलनाचा आणि ईमानदारीचाही.आज कोणत्याही राजकिय पक्षाची भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची ईच्छाशक्ती दिसत नाही.त्यांनी देशातील जनतेची ताकद "अंडरईस्टीमेट" केली आहे.जनतेत असलेल्या संतापाचा त्यांना पत्ताच नाही.बहुदा जे.पीं.च्या वेळेपेक्षाही यावेळी जास्त तरुण आंदोलनाला पाठींबा देत आहेत.त्याचे कारण तरुणांची काहीतरी करण्याची ईच्छाशक्ती,समकालीन राजकारणाची तीव्र नफरत,नेत्यांचे भ्रष्ट वर्तन, मस्तवाल आणि बेदरकार सत्त्ताधिश आहेत.स्वातंत्र्यानंतर प्रथमच भ्रष्टाचारावरुन एव्हढे माजी मंत्री/खासदार/प्रशाषक तुरुंगात गेलेले असावेत.हे सारे संतापजनकच आहे.लोकभावनेचा आदर करुनही केवळ भाबडेपणाने हा महाभयंकर प्रश्न सुटेल असे मानता येत नाही.अण्णांच्यामागे असणारे काही बेरकी/प्रतिगामी लोक कोण आहेत याचाही विचार झाला पाहिजे.त्यांचा आणखी काही छुपा अजेंडा तर नाही ना याचाही शोध घेतला जाणे चुकीचे म्हणता येणार नाही.संसदेला ओव्हरटेक करण्याऎवजी किंवा संसदेला वळसा घालण्याऎवजी आगामी निवडणुकीत सहभागी होवुन स्वच्छ चारित्र्याचे लोक संसदेत जातील असेही अण्णांनी पाहिले पाहिजे.राजकीय प्रक्रियेबाबत लोकांमध्ये नफरत वाढु देणे परवडणारे नाही.त्यातुन विभुतीपुजक/सरंजामी भारताची वाटचाल हुकुमशाहीकडे होईल. ती लोकशाहीची म्रुत्युघंटा असेल.
मात्र ज्या संसदेला आण्णा वेठीला धरीत आहेत अशी सत्ताधारी ओरड करीत आहेत तेथील खासदार तरी काय प्रकारचे आहेत?ते जर खरेच स्वच्छ असते तर त्यांनी जनतेचा विश्वास गमावला नसता.त्यामुळे ह्या खासदारांच्या हातात देश सुरक्षित आहे असे मानणे भाबडेपणाचे होईल.ज्या गटांना आण्णांच्या आंदोलनाबाबत शंका आहेत त्यांनी याचा विचार केला पाहिजे की चतुर सत्ताधारी आपल्याला आण्णांच्या विरोधात वापरुन तर घेत नाहीत ना? कारण एरवी याच सत्ताधा-यांचे जातवार जनगणना,दलित अत्त्याचार,महिला आरक्षणात ओबीसी कोटा ठेवणे याबाबतचे वर्तन कोणते प्रामाणिक आहे?आज अनुसुचित जाती/जमाती उपघटक योजनेचा निधी सरळसरळ दुसरीकडे वळवला जातो.,ओबीसी जातवार जनगणनेबाबत संसदेत दिलेले वचन सरकार पाळत नाही, महिला आरक्षणात ओबीसी महिलांना कोटा द्यायला सरकार तयार नाही,दलित अत्त्याचारांना रोखण्यात सरकार अजिबात गंभीर नाही.त्यामुळे आपण स्वता:ला ह्या सरकारला वापरु द्यायचे काय?याचाही विचार केला पाहिजे.सरकारच जर राज्यघटनेशी प्रामाणिक नसेल तर त्यांचा सध्याचा दावा कसा खरा माणणार?भारतीय जनता फार मोठ्या प्रमाणात आण्णांसोबत  असताना आपण या कोट्यावधी जनतेपासुन फटकुन राहिलेच पाहिजे काय?
सरकारच्या सापळ्यात अजिबात न अडकता आणि जनतेपासुन फटकुनही न राहाता आपण निर्णय घेतला पाहिजे. तथापि आण्णांच्या भोवतीच्या प्रतिगामी कोंडाळ्यालाही शरण न जाता चळ्वळीने आण्णांच्या आंदोलनाबाबत फेरविचार करावा असे मला वाटते.आपली भुमिका स्वतंत्र जरुर असावी परंतु ती विरोधातच असावी की आपली मुद्दे पुढे रेटणारी असावी याचीही चर्चा झाली पाहिजे.कारण ही लढाई फार मोठी आहे.लांबपल्ल्याची आहे.आपण समाजत "ब्रांड" व्हायचे की लोकशाही मार्गाने आपला अजेंडा राबविणारे हे आपल्या भुमिकेवर अवलंबुन राहणार आहे.

33 comments:

  1. Rohan Choudhary: "Thank you for writing a good blog. I am not deserve to comment on your blog. Sir whatever you mention this is right but i have some objection regarding this. First sir it is not always correct that majority is always right, i think we are facing the problem of that majority politics here agitator are majority, second centralization of power, from Gandhi to Anna Hajare people of India are habitual to depend on one person, this movement is not exception for that I have objection your statement,"संसदेला ओव्हरटेक करण्याऎवजी किंवा संसदेला वळसा घालण्याऎवजी आगामी निवडणुकीत सहभागी होवुन स्वच्छ चारित्र्याचे लोक संसदेत जातील असेही अण्णांनी पाहिले पाहिजे". The middle class which are involve in this movement,we have to ask them, how you get your licence, passport, ration card, At that time due to the lack of time mos of us give money to them. I am very much admire of you and Anna Hajare, but the Centralization of Dependence is harmful for any society. I just want to say eradicate corruption, poverty are the collective responsibility not sole responsibility." {FROM:FACEBOOK}

    ReplyDelete
  2. DrRahul Ingle: "rohan bt here anna means we ppl nd u told we cant depend on one person
    bt why u told
    to anna tht
    there should b
    leader wth gud character
    it is our responsibility
    u cnt blame to only anna" {FROM:FACEBOOK}

    ReplyDelete
  3. Anis Ambade: "if constitution providing all facility.then theres is no need of lokpal just implement properly on our constitution.bcos after that everyone will go for hunger strike and will say close the reservation" {FROM:FACEBOOK}

    ReplyDelete
  4. Khare tar sattadhari lokana ya chalvaliche ashcharya vatayala nako aahe. Jemtem 50% honarya matadanat aaj chalvalit sahabhagi zalele konicha navate tyamule hi dhummas achanak samor aali ase vatate aahe. Pan hi aapalya kalatil Bharatatil anek arthani sarvat vishistyapurna chalval aahe. Apalyatil konich Gandhijinbarobar navate na JP barobar. Mothya sankhyene aani shantatamay margane prashna sodvayache samajik shikshan aapalyala kadhich milale nahi pan hya netyana nidan tyache bhan aahe he kiti uttam aahe. Narake Sir mhanatat te barobarach aahe. Mhanunach Buddhivadi lokani chalavalila aatun pathimba dyayala hava. Karan chalval sampalyanantar pudhe kay yachi disha dakhavanyasathi tyanchi garaj aahe.

    ReplyDelete
  5. Praveen Wankhede: "Sorry Sir, but I would beg to differ with you here. I think we (all of us) are mixing up issues, instead of resolving them one by one.I agree corruption is a problem, our elected MPs are a problem, the whole system is a problem...but that does not mean there is one instant solution to all problems...its becoming like the UK riots now, where the cause was different and reaction was differnt...here the cause is corruption, which we all know, needs 360 deg approach to curb and not a complex parallel structure which Anna is after...I have a lot of respect for Anna and admire his social work a lot...but I think this time he is doing more than just social work..." {FROM:FACEBOOK}

    ReplyDelete
  6. Suresh Khillare: "ek vel manal, narke sir pan 120 karod janteche fakt pachach lok civil society bannar, ani bakiche uralele sarv uncivilized society ka?. yeravi annanche nav hi mahit nasnara delhi ch media ratorat unala mahatma banvatat.anodal corruption against ahe tar mag crore rupaye che expensive flex ananyasathi konakadun corruption zal. tumacha manayapramane annacha pathimage media, tarunai ani madham varg ahe. aho media ch ti rozi roti ahe, te tyanch kamach ahe. they all are paid for this. rahila prashn tarunaicha , tar te sarv khatyapitya ghartil ahet. pot bharlyavar rahleli samjseva karayala gharacha baher nighaleli tarunai, ani midddle cllass ha vicharik lnkacha varg asato mane. manun tyana asya activit madhe bhag ghyavacha lagato. he fakt var ahe, je kahi kalananter adhun-madhun mahatma lokankadunyet asate. satesathi chalvalele var, arvind kejrival black money white karun denayacha sarkari dalala ahe. bjp kadun purn thakat tyanchamage ahe karan kontahi parshitit bjp la satet yayach ahe. sateshivay BJP far kal jagnar nahi. BJP cha ayushacha prashn ahe .... manun ha sarv khatatop........sarv kahi satesathi......aaj je virodhak corruption virodhi ladthat, sarvat mothe-mothe corruption kand kase karyech tyanich deshala shikvale...ani RSS la system chalvachi ahe......." {FROM:FACEBOOK|

    ReplyDelete
  7. Milind Joshi commented on your link.
    Milind wrote: "अण्णांचे आंदोलन लोकशाहीला धोकादायक आहे का? - कलमाडी आम्हीच पुण्याहून सनदशीर मार्गाने निवडून दिले आहेत. असे अनेक आरोपी संसदेमध्ये बसतात. सामान्य माणूस निवडून नाही जाउ शकत म्हणून त्याचा आवाज नको हे बरोबर नाही. जे संसदे ला धोका - लोकशाही ला धोका म्हणून धास्तावलेले आहेत तो धोका आधीच सर्व पक्षीय स्वार्थी राजकारण्यांनी सामान्य माणसाशी द्रोह करून केला आहे. भ्रष्ट किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार सर्व प्रमुख पक्ष निवडणुकीला उभे करतात तेव्हा 'लोकशाहीला धोका' असे ओरडलेले कोणी ऐकिवात नाही. जन-आंदोलनामुळे तो होतो आहे हे खरे नाही. गेल्या २० वर्षांतील वाढत्या लोकविरोधी धोरणांमुळे सामान्य माणूस आणि सद्य लोकशाही व्यवस्था यात मोठी दरी निर्माण झाली आहे. लोकशाही ही केवळ विधीमंडळे - निवडणूक - घटना एवढी मर्यादित नाही. त्यात केंद्रस्थानी सामान्य माणूस असायला हवा. नफेखोरीची अर्थव्यवस्था, घराणेशाही, भ्रष्टाचार यात बरबटलेल्या आताच्या सिस्टीमने तो फोकस घालवला आहे. म्हणून तर इतक्या उत्स्फूर्त पणे लोक रस्त्यावर उतरले आहेत. स्वातंत्र्यानंतर ग्रास रूट मधील लोकांना आजवर गेल्या ६४ वर्षात काय काय मिळाले आणि प्रमुख उद्योगपती, व्यापारी, राजकीय पुढारी आणि त्यांचे बगलबच्चे यांची मालमत्ता किती प्रमाणात वाढली याचे गणित जरा समजून घ्याल तर लोकांच्या आंदोलनाबद्दल एवढा नकारात्मक सूर लागणार नाही. आपल्या देशात सुसज्ज राजकीय- वैचारिक बांधणीतून तळागाळातल्या लोकांसाठी काम करणाऱ्या संघटीत देशव्यापी आंदोलनाची उणीव आहे. सध्याचे हे आंदोलन व्यक्तिकेंद्रित आहे. त्यात अनेक अव्यवहार्य गोष्टी आहेत. मेणबत्ती - टोप्या अशा व्यक्त होण्याच्या fashonable पद्धती आहेत. आपल्याला जमेल त्या मार्गाने लोक व्यक्त होत आहेत - त्यामुळे आंदोलन लोकशाहीला धोकादायक ठरत नाही. जनलोकपाल बिलातील काही मुद्दे घटनेच्या चौकटीत बसत नाहीत त्यावर जास्त विचार होऊ शकतो. अण्णांबद्दल काही व्यक्तिगत टीका असेल ती ही जरूर व्हावी पण माणूस हा black or white असा बघून चालणार नाही. कोणतेही शांततामय - सनदशीर मार्गाने जाणारे जन आंदोलन अंतिमतः लोकशाही बळकट करते. सामान्य माणसाचे हे पाउल स्वागतार्ह मानायला हवे. त्यातल्या त्रूटी बाजूला होऊन ते जास्तीत जास्त परिणामकारक होईल ते पाहणे आवश्यक आहे." {FROM:FACEBOOK}

    ReplyDelete
  8. Baban Gangadhar KolsePatil: 11:12am Aug 19
    "अण्णांनी भ्रष्टाचार विरुद्ध सुरु केलेली चळवळ हि अभिनंदनास पात्र आहे. अण्णांचा प्रामाणिकपणा व अण्णांनी घेतलेला भ्रष्टाचार विषय यात कोणाचेही दुमत असू शकत नाही. आम्ही सगळे दररोजच्या जीवनात भ्रष्टाचार ने पिडीत आहोत. जे लोकपाल बिल ४० वर्षे या न त्या कारणाने लोकसभेपुढे येत नव्हते ते अन्नानामुळे चर्चेत येवून लोकसभेपुढे आलेले आहे. मात्र अण्णांच्या लोकपाल बिल मसुदा अण्णांनी देशातील सगळ्या पक्ष प्रमुखाना व आमदार खासदारांना पाठविलेला आहे तो आज सर्वांपुढे चर्चेला आहे. मात्र अण्णांचा मसुदा कोणताही राजकीय पक्ष किवा खासदार आमदार जशास तसा स्वीकारायला तर्यार नाहीत असे दिसते. त्याची करणे ते ते पक्ष व खासदार आमदार यांच्या मताप्रमाणे असू शकतात.

    देशाचा कारभार हा भारतीय संविधाना प्रमाणे चालतो. भारतीय संविधान हे देशाच्या कारभारात सर्वश्रेष्ट आहे. गल्ली ते दिली सर्व कारभार संविधानाच्या चोकटीत चालला पाहिजे यात कोणाचेही दुमत असता कामा नये. अशा अवस्थेत अगदी पार्लमेंट ला देखील कायदा करताना तो घटनेच्या चोकटीत बसणारच करावा लागतो. अन्यथा सर्वोच न्यायालय तो कायदा रद्द करू शकते. आज अण्णांनी ज्या लोकपाल बिल अगृह धरतायत त्यातल्या काही तरतुदी घटनेच्या चोकटीत बसत नाहीत. त्यामुळे अण्णांनी दिले तसे लोकपाल बिल पार्लमेंट ने पास केले तरी तो कायदा सर्वोच न्यायालयात रद्दबादल होण्याची भीती आहे. त्यासाठी घटना बदलावी लागेल . घटनेच्या मूळ ढाच्याला हात लावण्याचा कोणालाही अधिकार नाही. उदा. न्याय व्यवस्थेची स्वतंत्रता अबाधित ठेवणे हा घटनेच्या मूळ धाच्याचा भाग आहे. लोकपाल नावाची संस्था निवडून आलेले लोकप्रतिनिधी नालायक आहेत म्हणून त्यांच्या डोक्यावर नेऊन बसविले तर अप्रत्यक्ष रित्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या ऐवजी निवडून न आलेले मुठभर देशावर सत्ता गाजविण्याची भीती आहे. नेमके हेच या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठींबा मिळण्याचे कारण आहे.मुठभर अभिजन व मुठभर उद्योगपती देशावर अप्रत्यक्षपणे नेहमीच राज्य करण्याचा प्रयत्न करतात सगळी प्रसार माध्यमे त्यांच्या ताब्यात असल्यामुळे ते म्हणतील तसे चुकीच्या पद्धतीने प्रसार प्रचार करून या देशात अराजक माजविण्याचे काम ते करत असतात. अण्णा हजारे हे निष्पाप आहेत. त्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून कोण लढताय ते त्यांना माहित नाही. बॉम्बस्फोट, जातीय दंगली हा तर आमच्या देनंदिन जीवनाचा भागच बनला आहे. भ्रष्टाचार हा काही देशातील एकमेव प्रश्न नाही किंबहुना लोकपाल आल्या नंतर देश भ्रष्टाचार मुक्त होईल हे कदापि शक्य नाही. भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेला जगातील कोणताही देश भ्रष्टाचार मुक्त झालेला नाही. अर्थव्यवस्था कायम ढेवून आपला देश भ्रष्टाचार मुक्त होईल याची सुतराम शक्यता नाही. देशातील सर्व पक्ष आणि जवळ जवळ सर्व नेते भ्रष्टाचार करतात हे तुम्ही आम्ही जाणतोच आहोत. या आंदोलनातून काहीही निष्पन्न होणार नसल्यामुळे तरुणांचा भ्रमनिराश होणार आहे. हा प्रकार देशतील कोणत्याही चांगल्या आंदोलनाचा अडसर ठरणार आहे" {from:FACEBOOK}

    ReplyDelete
  9. Makarand Gadgil: "very balanced blog sir and much needed one when public discourse on whole issue has become vitiated and bias. if you say, some points of anna are worth considering, you become anti constitutional and if you say anna is taking extremist position then you become supporter of corrupt UPA govt. and i request you to translate your this blog in English too, so that your balanced views can reach to wider audiance"
    4 hours ago · Unlike · 1 person

    Sanjay Salve: "anna & annalike people seem to be not believing in democracy.people of pakistan also say that there should have been a great man like dr ambedkar. obama says nearabout thousand years people of india don't have to worry because the constitution of india is written by dr ambedkar.
    3 hours ago · Like

    Nitin Patil: "Rajyakartyana Ghatanepeksha swatachi KHURCHI janar, yachich kalji jast...karan Praamanikpanacha Abhaav?"
    2 hours ago · Like

    Rajendra Nikam: "Narake sir, Kharokharach Annchya andolanala changala pathimba aahe, tyat wadach nahi, paruntu Annani swikarlela marg chukicha ahe. Tyanchya karyabaddal aamhala sudha aadar ahe. Aaj Kalmadi, Kannimoli ani A Raja sarake lok turungat ahet te kashmule ? Jar yanna atak karanyyche paryapta kayade aapalyakade aahet, mag anakhi nivin kayada kashala ? Pramanik ani kathor pane jar kayadyache palan zale tar bhrashtachara nakkich aala basel. Janlokpal bill aalyamule 100% soda parantu 60% tari he shakya aahe ka ? Anna kiwa konihi yachi khatri deeel ka ?" {FROM:FACEBOOK}

    ReplyDelete
  10. Shrikant Barhate: "I think some of your assertions about Anna Hazare and the Government are relegating key contexts to oblivion. Constant neglect by the Congress government of the corruption and hence governance challenge has created an enormous anger in the minds of people. But tinpot tamasha on Janlokpal is not about the law. Had it been for the law, the sacrosanct nature of the constitutional provisions for the formation of a particular legislative agenda itself would not have come under the attack by arbitration from Anna's team. Their opposition for the due process is not only anarchic, it is downright dishonest to their own insistence upon the rule of law; a key componant of good governance. Secondly, the agenda is sinister. They are shifting the centripetal guarantee embedded in the textual conformance to the constitutional point of reference to the social ratification; an another anarchic expression. They are shifting the epicenter in the form of legislative assembly to perceptual bargaining, a position riddled with dangers to the structural stability of the nation."
    18 hours ago · Unlike · 1 person

    Manohar Kakade: "अण्णा हजारेंच्या आंदोलनाचे पुर्वीचे माहीत नाही. पण यावेळी भाजपला संघपरीवाराला कटाक्षाने दूर ठेवले जात आहे. मुंबईत भाजपला प्रतिबंध केला गेला होता. पण येवढ्या मोठ्या आणि उस्फुर्तपणे चाललेल्या आंदोलनात काही ठिकाणी आरएसएसवाले आदोलनात घुसलेही असतील. पण तेव्हढेच दाखवून जनतेच्या सहभागातून चाललेल्या या आंदोलनाला कमीपणा आणण्याचा खटाटोप करणार्‍याच्या उद्दीष्टांबाबत शंका आहे. गेल्या काही दिवसातली अण्णा हजारेंची मांडणीही बदललेली आहे. ते केवळ भ्रष्टाचारापलीकडे समग्र परिवर्तनाची भाषाही करीत आहेत. ह्या बदलाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहायला हवे. भाजपचा जनलोकपाल बिलाला पूर्ण पाठींबा नाही हेही लोकांना सांगितले पाहीजे. हे न करता काहीतरी खुस्पटे काढत बसून आंदोलनापासून अलिप्त राहणे घातक आहे. त्यामुळे याचा फायदा जरून प्रतिगामी घेतील. लोकाच्या हिताचे काय हेही आपल्याला कळेनासे व्हावे हे आश्चर्यकारक आहे" FROM:FACEBOOK}

    ReplyDelete
  11. Shiram Panherker: "choranchya ultya bomba aahet..lokshahicha kalvala asnanre jevha lut karirt hote tevha aamche imandar manlya janare p.m dole mitun zople hote kay?.. kalmadi raja..yanchi evdi kashi kay himmat zali?..THOMAS CHA RECORD KA DURLAXILA GELA..cag nusar tar ya sarvana karagruhat jayla pahije tyamule lokshahivar aakraman sansad khatreme..asha choranchya ultya bomba aahet..BHARTIY LOKSHAI SUDDRUD HOTE.. ANNACHE AANDOLAN NAXALVADASAH SARVA SAMSHYAGRASTHASATHI VARDAN THARAVE,"
    Yesterday at 8:34pm · Like · 1 person

    Kiran Kokate: "lokpal badal tumahala kay vatate sir ?" {FROM:FACEBOOK}

    ReplyDelete
  12. Sir,

    Please read my feeling written on
    Jantar mantar Andolan.

    https://www.facebook.com/note.php?note_id=1959669908896

    ReplyDelete
  13. Sudhir Gavhane:
    "Indian youth has shown enough strength to govt and opposition parties . our anger has reached to them. they have realiazed that enough. its time to save life and spirit of anna hajare for future agitation . we can`t undermine our democratic system ,even when we r for chaging corrupt system . we have to change it by using present democratic tools and system only." {FROM:FACEBOOK}

    ReplyDelete
  14. Abhijit Ganesh Bhiva:
    "अन्ना हजारे आणि टीम ची वशिलेबाजी तर नाही ना ?विचार करा आणि ठरवा .
    १)लोकपालाच्या मसुद्यात दोन मगसेसे पुरस्कार व्यक्ती असले पाहिजे अशी शर्त ठेवण्यात आली आहे - .अन्नाच्या टीम मध्ये अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांना मगसेसे पुरस्कार मिळालेले आहेत .
    २)चार कायदे तज्ञ लोक असले पाहिजे उच्च न्यायालायालय किंवा त्याच्या पातळीच्या वरचा यांचा अनुभव असावा अशी एक अजून शर्त आहे -अन्नाच्या टीम मध्ये मिडिया समोर राहणारे संतोष हेगडे ,(पूर्व उच्च न्यायाधीश ),शांतीभूषण केजरीवाल (सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय वकिली ),प्रशांत भूषण (सर्वोच्च व उच्च न्यायालयात वकिली ) असे लोक आहेत .
    ३)आधी निवडून येणार लोक नंतरच्या लोकांना निवडून देण्यात मदद करतील असे अजून मसुद्यात म्हटलेले आहे -मनिष सिसोदिया (पत्रकार होते ) स्वामी अग्निवेश (आर्य समाज ) रवी शंकर ,ह्या लोकांना नंतर हे लोक निवडून देतील असा भाग केला गेला आहे का ?
    त्यानंतर मेधा पाटकर ह्या आंदोलन्याच्या अजून एक समर्थक आहेत .
    एक वेळा जे लोकपाल निवडून येत जातील त्यापुढे ते लोकपाल पुढच्या निवडणुकीला सल्ला देत जातील .-पुढचे सर्व लोक आपल्या हातचे मोहते असावे असा काही अंदाज आहे का ?
    ४)वयाची शर्त ४० पेक्षा कमी नसावा आणि ७० पेक्षा जास्त नसावा .-हि शर्त मा.अन्ना हजारे(वय ७४ ) साहेबांना तेथून वगळावे ह्या साठी तयार केली गेली आहे का ? बाकीची सर्व मंडळी मध्ये अजून काही भाग साम्यता आहे का ? अन्ना हजारे यांचा फक्त वापर होत आहे का ? अन्ना यांचे वय झाले आहे त्यामुळे आपले नाव अजरामर व्हावे ह्यासाठी अण्णांचा प्रयत्न आहे का ? वाशिलेबाजीची किती शक्यता वाटते ? सर्वांनी आपली मते कळवावी .धन्यवाद" {FROM:FACEBOOK}

    ReplyDelete
  15. Devidas Peshave:
    "लोकपाल बिलावरून सुरु असलेले आंदोलन हा पुन्हा एकदा महात्मा गांधी च्या अहिंसा आणि समाज प्रबोधन या तत्वांचा विजय आहे आणि हिंसेचे समर्थन करणारे आणि महात्मा गांधीना शिव्या देणाऱ्या वर्गाचा दारूण पराभव आहे , कारण हिसेचे समर्थन करणारे कित्येक जण गांधी टोप्या घालून मेण बत्ती सह आण्णांच्या आंदोलनात उतरलेले दिसतात ."{FROM:FACEBOOK}

    ReplyDelete
  16. Sudhir Gavhane:
    "the corruption in education system is more dangerous than any other corruption. from admission to appointment ,from result to assessment ,from research to research publication [plagiarism] corruption is rooted like any thing . when education is polluted there can not be moral society . corrupt education give birth to corrupt society. anna hajare must undertake next agitation to clan up the highly corrupt education system in india. what`s your opinion ?" {From:Facebook}

    ReplyDelete
  17. Sanjay Tikariya:
    "अन्ना हजारे १ नाव... नाही १ तत्व आहे ... १ सामान्य माणसाला भेटलेली किरण आहे जी सर्वाना १ सुन्दर भारत अणि त्या सम्भंदित स्वप्न पूर्ण करण्यास मदत करीत आहे .... हजारोंच्या मनातील भ्रष्टाचारा विषयीच्या विरोधाला प्रकट करावनरी १ ज्योति आने ,,,, ही ज्योति सदा प्रज्वलित रहने गरजेचे म्हनुनच आन्नाना समर्थन आवश्यक .......... आपणही या कार्यत सामिल होने गरजेचे कारण प्रश्न देशाचा आहे"
    Wall Photos
    Yesterday at 9:08pm · Like · · See Friendship

    Sanjay Tikariya: ‎.(सर्वानी आपापल्या इतर मित्राना हा सन्देश पाठवून भ्रष्टाचारा विषयीच्या विरोधाला प्रबल करावे ..... संजय टिकारिया ) {From:Facebook}

    ReplyDelete
  18. bhool thapana bali jau naka annacha vichar kara
    by Chandu Bhople:
    "सरकार झुकल्यानंतर काँग्रेसची अण्णांना हरविण्यासाठी 'सोशल' रणनिती
    'मी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. पण मी अण्णा नाही', 'मी तानाशाह नाही जे कोणी सांगले ते ऐकेन, मी लोकशाहीच्या पध्दतीवर विश्वास ठेवणारा आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही तसेच लोकशाहीनुसार चालणाऱया व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. स्वत:च्या फायद्यासाठी व स्वार्थासाठी काही लोक संसद चालवू देत नाहीत. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मला माझ्या देशाचा अभिमान आहे व मी एक प्रामाणिक नागरिक म्हणून मला माझ्या देशासाठी योगदान द्यायचे आहे. तर, तुम्ही निर्णय घ्या की तुम्हाला अण्णा हजारे बनायचे आहे की गौरवशाली भारतीय नागरिक, आपण २१ व्या शतकात राहतो, तसेच आम्ही विचार करु शकतो, अशा प्रकारचे संदेश काँग्रेस पक्षाने सोशल नेटवर्किंगद्वारे म्हणजेच फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब आणि एसएमएसवरुन पाठविण्यास सुरवात केली आहे."{From:Facebook}

    ReplyDelete
  19. Dinesh Kadam:" भ्रष्टाचाराची मुळ गंगोत्री ही सरकारी यंत्रणा आहे, जन्माचा, उत्पन्नाचा, जातीचा दाखला, रेशनकार्ड, लायसन्स, NC, NOC, टेंडर, सर्व दुकान, खाणी, उद्योग परवानगी, अश्या सर्वच श्रेत्रात सरकारी यंत्रणांची सामना करायची वेळ येते. आणि या सर्वच ठीकाणी लाच दिल्या शिवाय काम होत नाही. मग आपसुक खालच्यांना ही भ्रष्टाचार करावा लागतो. त्यामुळे आपल्याला मुळावरच घाव घालायचा आहे आता, आणि ती संधी आण्णांनी दिली आहे.
    जे आमदार, खासदार, मंत्री याला विरोध करतात, जात धर्म, कायदा मध्ये आणून त्यांची संपत्ती आणि गुन्हे किती आहेत ते पहा जरा!"{FROM:FACEBOOK}

    ReplyDelete
  20. Prakash Pol:
    "अण्णांच्या कार्यपद्धतीला विरोध म्हणजे भ्रष्टाचाराचे समर्थन असा अर्थ कसा काय निघू शकतो. भ्रष्टाचार सर्वांनाच नको आहे. परंतु जे लोकपाल बिल मांडले जातेय त्याबाबत तरी एकवाक्यता आहे का ? आत्तापर्यंत तीन मसुदे मांडले गेलेत. त्यात मुलभूत फरक आहे. मग अशा महत्वाच्या विषयवार चर्चा नको का व्हायला. कि घाई-गडबडीत अण्णांचा मसुदा मंजूर करायचा ?" {From: FACEBOOK}

    ReplyDelete
  21. Milind Dhumale:
    "ये किस तरह का आंदोलन है?
    किसका आंदोलन है?

    क्या सरकार और पुरी एडमिनीस्ट्रेशन ये सब लोगो को
    उल्लू बनाने मैँ जुटी है?

    जब बात लोकतंत्र की करते है
    उसके हिसाबसे चलते है

    सबको अपनी अपनी बात रखनेका
    विरोध करने का प्रावधान है

    ये न्याय सिर्फ अण्णा और उनकी टिम को ही है?

    क्या उनके खिलाफ हम अपनी बात नही रख सकते?

    आखिर क्यु?

    क्या अण्णा के आंदोलन को सरकारही हवा दे रही है?

    कल हमे विरोध करनेसे प्रतिबंद किया गया
    AZADA MAIDAN-DSP ने कहा अगर कुछ करोगे तो धारा १५१ लगाके अंदर कर देँगे

    क्या यह सही है?" {FROM:Facebook}

    ReplyDelete
  22. BAHUJAN ALL INDIA: "जन लोकपाल मधील सदस्या विषयी एक नियम हा आहे कि सदस्यांची वयोमर्यादा हि ४० ते ७० च्या मध्ये असावी , मग असे असताना या जन लोकपाल सदस्यान मध्ये ७४ वर्ष वय असणाऱ्या अण्णांना सामील कसे काय केले आणी जरी केले नसेल तर याचा उघड अर्थ हा आहे कि अण्णांचा उपयोग फक्त उपोषणा पुरता करण्यात येत आहे , अण्णांचा उपयोग करून घेण्यात येत आहे , गर्दी जमविण्या साठी अन्नान सारखा ब्रांड आपल्या भारतात शोधून सापडणार नाही , म्हणून अरविंद केजरीवाल आणी टीम ने अण्णांना फक्त सरकार वर प्रेशर टाकण्यासाठी बरोबर घेतले आहे , हे उघड सत्य आहे .
    Added 8 hours ago · Like ·
    Avinash D Kadam, Ganesh Chavan, Baba Gade and 5 others like this.

    Abhijit Ganesh Bhiva सहमत .......
    8 hours ago · Like

    Sanjiv Gaikwad अगदी बरोबर !
    8 hours ago · Like

    Dinesh Kadam tya sarvani shapath ghevun sangitale aahe aamhala kontihi aasha nahi,
    Aamhala konte hi pad nako , adhikar nako. Fakt desh bhrashtachar mukt zala pahije, garibanchi kame lavakar zali pahijet. Aani gunhegarala, ghotale bajana lavakar shasan za...See More
    8 hours ago · Like

    Abhijit Ganesh Bhiva अरविंद केजरीवाल यांनी आरक्षण विरोधी आंदोलन २००६ साली चालवलेले आहे .तसेच ते लोक आरक्षणावरून पुढे जाणार्या लाकांना सुद्धा भ्रष्ट समजतात .असे संजय सामंत साहेबांना सांगितले आहे आणि त्यांना काही लिंक सुद्धा दिलेल्या आहेत .जे अन्ना समर्थक लोक असतील त्यांनी त्या जरूर पाहाव्या .
    7 hours ago · Like · 1 person

    Dinesh Kadam जाती भेद छोडो !!! भ्रष्टतंत्र और भ्रष्टाचारीयों को गाडो !!!
    अब उन्हे मौका ना दो !! इसी मौके का फायदा उठा के पिछले 65 साल से उन्होंने हम पे राज किया.
    आज भी गांव गांव मे हर वर्ग का आम आदमी बोहोत दुखी है, उसका हक उसे मिलता नही.
    सरकार उसके लिए जो योजना लाती है, भ्रष्टतंत्र बिचमे हडप कर लेता है, अब तो एकता दिखाओ, वरना भविष्य तुम्हे माफ नही करेंगा निजी अंहंकार और स्वार्थ छोडो !! और हम सब भारतीय है कहो!
    7 hours ago · Like

    Harshawardhan Deshpande ‎@ abhijit Bhiva can you share the links about Kejriwal again? thanx in advance {FROM:FACEBOOK}

    ReplyDelete
  23. Sachin Shendge:
    "अन्ना हजारेचा “माहीती अधिकार कायदा” म्हणजे खंडणीखोरासाटी खंडणी गोळा करण्याची एक उत्तम संधी" {FROM:FACEBOOK}

    ReplyDelete
  24. Vishwajeet Jain:
    "ARUNDHATI ROY one question to you....HOW MUCH YOU GOT FROM CONGRESS TO COMMENT ON ANNA LIKE THIS ????" {From:Facebook}

    ReplyDelete
  25. Prakash Kulkarni:" भ्रष्टाचार विरोधी पोस्ट कार्ड आदोलन
    माझी सर्वाना विनंती की जर आपण भ्रष्टाचार विरोधी आहात आणि जन लोकपाल बिल यावे असे वाटत असेल तर आपल्या मतदार संघातील खासदाराला एक ५० पैशाचे पोस्ट कार्ड पाठवा आणि जनलोकपाल बिल पास करन्याची विनंती करा. लाखो पोस्ट कार्ड त्यांच्या घरी जाऊ दया. घरी बसून सुद्धा आपण आन्दोलन करू शकतो.

    ही पोस्ट आपल्या इतर फ्रेंड ला सेंड करा.
    भ्रष्टाचार मिटवा . देश वाचवा." [From:Facebook}

    ReplyDelete
  26. Dinesh Kadam: ‎"!! खतरा !! खतरा !! खतरा !!
    मेरी तरफ से सभी राजनैतिक पार्टीयों के लिए एक सुझाव खास करके कॉग्रेस के लिए !!
    जितने जादा दिन अन्ना का अनशन लंबा खिचेगा, उतना जादा जनता के दिल मे सरकार और पार्टीयो के लिए नफरत बढेंगी.
    भविष्य मे जब इतिहास देखा जायेंगा तब ये शरम कि बात होगी के एक 74 वर्षीय बुजूर्ग ने भ्रष्टतंत्र और भ्रष्टाचारीयोंको खतम करने के लिए अपने ही सरकार के खिलाफ कई दिन के लिए अनशन किया था, और सरकार ने उन्हे बोहोत परेशान किया था, जेल मे डाला था!
    4 hours ago · Like

    Dinesh Kadam कानून बनाने की प्रक्रीया लंबी होती है !!! और उसमे लंबा वक्त लगता है !! इसे आप मान ले !! - पंतप्रधान ने ये बात आज कही !!
    माननिया प्रधानमंत्री जी कितना वक्त लगता है कानून बनाने में ??? 42 साल ???
    हा हा हा हा हा हा हा !!
    अब जनता जागी है !! देश हित , जनता हित के काम करो; या फिर खुर्सी खाली करो !!!
    हमे ऐसा मजबूर प्रधानमंत्री नही चाहीए ; जिसके बच्चे(मंत्री) देश कि तिजोरी लुटे और आप देखते रहे !!
    4 hours ago · Like

    Dinesh Kadam जाती भेद छोडो !!! भ्रष्टतंत्र और भ्रष्टाचारीयों को गाडो !!!
    अब उन्हे मौका ना दो !! इसी मौके का फायदा उठा के पिछले 65 साल से उन्होंने हम पे राज किया.
    आज भी गांव गांव मे हर वर्ग का आम आदमी बोहोत दुखी है, उसका हक उसे मिलता नही.
    सरकार उसके लिए जो योजना लाती है, भ्रष्टतंत्र बिचमे हडप कर लेता है, अब तो एकता दिखाओ, वरना भविष्य तुम्हे माफ नही करेंगा निजी अंहंकार और स्वार्थ छोडो !! और हम सब भारतीय है कहो!" {FROM: FACEBOOK}

    ReplyDelete
  27. Anil Shidore:
    "अण्णांच्या, अण्णांनी पुढाकार घेतलेल्या, भ्रष्टाचार विरोधातील आंदोलनाला मध्यम वर्गातील शिकलेला, शिकणारा आणि घरची आर्थिक परिस्थिती बरी असणारा तरुण वर्ग उतरला, ही खरोखर समाधानाची गोष्ट आहे, आनंदाची देखील. त्यांचा असाच उत्साह निवडणुकीत, मतदान करण्यामध्ये, चांगले उमेदवार शोधण्यामध्ये, स्वतः राजकीय प्रक्रियेत भाग घेण्यामध्ये आणि ह्या देशाचे भविष्य घडवण्या मधेही असावा हीच इच्छा" {From:Facebook}.

    ReplyDelete
  28. Amar Ghatpande:
    "आमच्या ओळखीच्या संस्कार वर्गातील बाईनी काल एक किस्सा सांगितला...
    म्हणाल्या कालच तीन चार चिमुरड्यांची चर्चा चालू होती, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐकू लागले
    तर त्यांचात अण्णा आणि भ्रष्टाचार हे विषय चालू होते तेव्हा मी सहजच त्यांना विचारले
    कि तुम्हाला कोणी हे सांगितले? तुम्हाला काय माहित भ्रष्टाचार किंवा त्या बद्दल?
    तुम्हाला काही समजते का तरी? तर एकेक चिमुरडा आणि चिमुरडी धीट पणे म्हणाले:

    "म्हणजे आम्ही घरच्यांचे एखादे काम केले म्हणून 'म्याक्डोनाल्द' ला नेले तर भ्रष्टाचार झाला"
    "शाळेत किंवा कोलेजात आडमिषण साठी पैसे दिले तर भ्रष्टाचार झाला"
    "परीक्षेत चांगले मार्क मिळवलेस तरच सायकल देईन म्हणाले तर भ्रष्टाचार झाला"
    किंवा "समजा त्र्याफिक चा नियम चुकून तोडला गेले तर दंड न भरता समजून घ्या म्हणाले तर भ्रष्टाचार झाला"
    अश्या अनेकानेक गोष्टी सहज निर्मल पणे त्यांच्या निर्मळ बोलण्यातून बाहेर पडल्या...
    आणि मी थक्क झाले...
    मी मनोमन अण्णाचे आभार मानले...म्हणाले धन्य आहे !!!
    आणि पुढे म्हणाल्या आहो अनेक संस्कार शिबिरे घेऊन नुसती घोकम्पाट्टीने
    किंवा तात्पर्य युक्त अश्या गोष्टीनी साधत नव्हते ते या जन आनदोलाना मुळे अगदी सहज घडतेय
    हे अनुभवून मला खूपच भरून आले !!!
    चला हे हि नसे थोडके !!!
    पालकांनी आपल्या व्यवहाराने हे अंकुर दाबू नयेत हीच प्रार्थना व सदिच्छा !!!
    असे जर होणार असेल तर मला उद्याच्या भारताची आणि नागरिकांची चिंता जरा कमी वाटू लागली..." {From:Facebook}

    ReplyDelete
  29. Sameeran Walvekar:
    "students of IIT kharagpur refused to take certificates in the hands of the PM of Country.. they said, we would like to have certificates in the hands of the person, who supports Janlokpal Bill !! Hats off to the impact of Anna !" {From: Facebook }

    ReplyDelete
  30. Milind Ranade: "मागच्या वर्षी इंटरनेट वर राष्ट्रकुल खेळात चालू असलेल्या भयानक भ्रष्टाचाराबाबत लेख आले आणि अमेरिकेतल्या आम्हा दोन तीन लोकांचे डोके फिरले. आम्ही त्वरित फेसबुक वर जावून या विरुध्द एक पान तयार केले आणि ते प्रकाशित केले. लगेच असे समजले की आदल्याच दिवशी दिल्लीच्या शिवेंद्र सिंग या तरुणाने एक पान तयार केले आहे. आम्ही विचार केला, एका कामा साठी उगाच दोन दोन वेगळी पाने कशाला? शिवाय आम्ही अमेरिकेत. या पानावर ठेवायला रोज नवा मजकूर आम्हाला कुठून मिळणार? आम्ही शिवेन्द्राला मेसेज पाठवला आणि त्याच्या कामात विसर्जित झालो. शिवेंद्र अश्या रीतीने आमचा जवळचा मित्र झाला. आज एका वर्षात पहा. त्या कॉमन वेल्थ झेल या पानाचेच इंडिया अगेन्स्ट करप्शन असे नवे नाव झाले आणि तो सर्व देशाच्या तरुणांचा नेता झाला आहे. हि आहे इंटरनेट ची आणि कार्याला वाहून घेण्याची शक्ती. उदाहरण साक्षात समोर आहे. हातच्या कंकणाला आरसा नको. आता फक्त नव्या दमाच्या नेतृत्वाची गरज आहे. जनता जागृत आहे आणि काही लोकांना वाटत होती तेवढी मूर्ख ही नाही. जनता तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. प्रश्न आहे हाच, की तुम्ही विश्वास ठेवायला पात्र आहात की नाही..." {FROM:FACEBOOK}

    ReplyDelete
  31. Anant K. Bhole: "निश्चित ही फक्त अणि फक्त फेसबुक ची क्रांति आहे. भ्रष्टाचार मिटायला पाहिजेच. पण आम्ही ४ लोक सांगू तोच कायदा व्हायला पाहिजे अस नको.
    शेवटी संसदेत बसलेली मंडळी काही बिनडोक नाही. कायदा बनाविन्याची एक प्रथा आहे.
    जी पब्लिक अन्दोलानात सामिल झाली आहे त्यांना भ्रष्टाचार नकोय. म्हनुनच ती सामिल झाली अन्दोलानात सामिल होत आहेत.

    या तरुण मित्रांना सांगावेसे वाटते की फक्त पैसा खाणे म्हणजेच भ्रष्टाचार नाही. तर आपल्या पालकांनी मोठी फी भरुनही कोलेज ला
    लेक्चर बुडाविने हा देखिल नैतिक भ्रष्टाचार च आहे." {FROM :FACEBOOK}

    ReplyDelete
  32. Shriniwas Deshpande:
    "लोकांना मेणबत्तीवाल्यांचा एवढा राग का येतो ....?
    बिचारे सगळे स्वत:च्या सामान घरूनच घेऊन येतात.
    निदान बोलणा-याकडे तरी मागत नाहीत.
    अन दु:ख झाले आहे एवढेच सांगतात....
    मला त्यांच्याबद्दल तेवढीच सह-अनुभुती वाटते
    जितकी इतर अहिंसक मार्गांनी आपले क्लेष व्यक्त करतात त्यांच्या बद्दलही वाटते.... .. ... .. .. "{FROM:FACEBOOK}

    ReplyDelete
  33. जेव्हा बुद्धिहीन जनता एखाद्या आंदोलनामध्ये भाग घेते, तेंव्हा ते आंदोलन असफल होते.........
    उदाहरणार्थ- जनलोकपाल बिल आंदोलन

    ReplyDelete