Saturday, May 14, 2011

विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी परीक्षा हाच सर्वोत्तम पर्याय- हरी नरके

नाशिक, दि.२३ (प्रतिनिधी) - शिक्षण क्षेत्रात कमालीची घसरण सुरू असून, याच काळात नेमका शालेय स्तरावर परीक्षाच न घेण्याचा निर्णय अत्यंत घातक ठरणारा आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा हाच सर्वोत्तम पर्याय असून, परीक्षाच बंद झाल्याने नजीकच्या भविष्यात शाळा आहे, शिक्षक आहेत; पण शिक्षणच नाही अशी परिस्थिती उदभण्याची भीती असल्याचे प्रख्यात विचारवंत हरी नरके यांनी सांगितले. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त झालेल्या अभीष्टचितन सोहळ्यात ते बोलत होते.
येथील रावसाहेब थोरात सभागृहात हा अभीष्टचितन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना नरके यांनी शिक्षण जोपर्यंत तळमळीने दिले जाणार नाही, तोपर्यंत ते तळागाळापर्यंत पोहोचणार नसल्याचे सांगितले. १८८२ साली महात्मा फुले यांनी केलेली शिक्षण मोफत, सक्तीचे आणि सार्वत्तिक करण्याची मागणी पूर्ण होण्यास २०१० साल उजाडावे लागले हे दुर्दैव असल्याचे सांगितले. पूर्वीच्या चातुर्वर्ण्य पध्दतीप्रमाणे आता शिक्षण क्षेत्रातही इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकलेले, कॉन्व्हेंट व इंग्लिश मीडियममध्ये शिकणारे, मनपा-जि.प. शाळांमध्ये शिकणारे आणि आश्रमशाळांमध्ये शिकणारे असे चार वर्ण निर्माण होण्याची स्थिती असल्याचेही नरके यांनी नमूद केले.
सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी मी केवळ अपघातामुळे राजकारणात आल्याचे सांगितले; मात्र या राजकीय कारकिर्दीत सर्वसामान्यांचे हित एवढेच ध्येय नजरेसमोर ठेवून कार्य केल्याचे सांगितले. सगळ्यांचे प्रेम आणि आदर हीच आयुष्यातील जमेची बाजू असल्याचेही दिघोळे यांनी नमूद केले. यावेळी उद्योजक अशोक कटारिया, आमदार डॉ. सुधीर तांबे आदिनीदेखील दिघोळे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर सौ. आशा दिघोळे, बाळासाहेब बोडके, शिरसाठ आदि मान्यवर उपस्थित होते.

1 comment:

  1. सर्व सामान्यांच्या डोळ्यात धुळफेक…….
    शिक्षण हा माणसाचा तिसरा डॊळा असतो.मात्र हा तिसरा डॊळा उघडण्याची मुभा या समाज व्यवस्थेने पुर्वापार नाकारलेली आहे.कारण या साठी विविध स्वरुपाच्या आख्यायीका सांगुन कारण तिसरा डॊळा हि संकल्पना शिव म्हणजेच शंकराच्या बाबतीत सांगितली जाते.व पुढे असेही सांगितले जाते की जर शिवाने आपला तिसरा डोळा उघड्ला जर या पथ्वीतलावर प्रलय येईल .पण विचार करण्यासारखी बाब हि की शंकर हा आपला तिसरा डोळा केव्हा उघड्तो ज्यावेळी कुठे अन्याय होतोय असे पाहिल्यावर अतीक्रोधित होऊन तो धरणी नष्ट करण्यासाठी नसून त्यावर होणारा अन्याय नष्ट करण्यासाठी बरोबर ना.मग जर शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असेल तर ज्यांना ज्यांना हा तिसरा डोळा उघड्ता आला अशा महामानवांनी या पथ्वीवर क्रांति घड्वून आणल्याची उदाहरणे आपल्या समोर आहेत.भारतात सुध्दा याची भरपुर उदाहरणे सापड्तात.
    मग पुर्वापार चालत आलेल्या या शिक्षण व्यवस्थेतुन अशी माणसं का घड्त नाहीत.मी अंधपणे हा विचार मांड्त नसून फार विचाराअंती मला पड्लेला प्रश्न मी मांड्तो आहे. आणि जर यांना या शिक्षणाने हा तिसरा डॊळा बहाल केला आहे तर असे महामानव आहेत तरी कुठं या बाबतीत कदाचीत तत्ववेत्त्यांची मते वेगवेगळी असतील मात्र या समाजात रुढ असलेली शिक्षण पध्दत जबाबदार असावी कारण इंग्रजांचे धोरण शिक्षण हक्काने द्यायचे मात्र यातून आपणाला आवश्यक असणारे कारकून कसे तयार होतिल हे पाहायाच तिच प्रणाली आजही आहे. स्पर्धा लावून शिक्षण दिलं अथवा घेतलं जातयं. स्पर्धेमुळे खरच का द्न्यान मिळतं. आज १ ली पासून जी स्पर्धा सुरु होते ती शिक्षण पुर्ण होई पर्यंत आणी नंतर हा समाजच सांगतो हे जीवन म्हणजे सुध्दा एक स्पर्धाच आहे.यात दुस-याला मागे टाकल्या शिवाय पुढे जाता येत नाही. इतिहास साक्षी आहे की या आपल्या देशात ज्यांना ज्यांना शिक्षणाने द्न्यान प्रात्ती झाली अशाच माणसांनी समाजसुधारण्याठी प्रयत्न केले.हेतु हाच ठेवला की या मानवजाती मध्ये एकता,समानता,बंधुता,प्रेम व शांतता नांदावी.त्यांना सुखाने निर्भयपणे आपले जीवन जगता यावे . मग शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडुनही आज या विचारांच्या माणसांची समाजात कमतरता का ?

    ReplyDelete